आयसीसीने जाहीर केली या दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची लिस्ट; धोनी, विराटसह भारताच्या ‘या’ 2 खेळाडूंना मिळाले मानाचे स्थान

दिल्ली :

आयसीसीने दशकातील सर्वोत्कृष्ट टी -20 खेळाडूंची (पुरुष आणि महिला) यादी जाहीर केली आहे. महिला दशकाच्या सर्वोत्कृष्ट 11 खेळाडूंमध्ये एका भारतीय खेळाडूला संधी मिळाली आहे. तर पुरुष गटातील पहिल्या 11 खेळाडूंच्या यादीत भारताच्या चार खेळाडूंचा समावेश आहे.

भारताकडून हरमनप्रीत कौर महिलांमध्ये पाचव्या स्थानावर तर ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक अलिशा हॅले पहिल्या क्रमांकावर आहे. पुरुष संघाबद्दल बोलायचे झाले तर दशकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली आहे. त्यानंतर सातव्या क्रमांकावर माजी कर्णधार एमएस धोनी आहे. याशिवाय भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दहाव्या क्रमांकावर आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here