IMG ची हिस्सेदारी खरेदी करणार रिलायन्स; पहा नेमका काय निर्णय घेतलाय अंबानींनी

सध्या जगभरात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि त्याचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची धूम आहे. त्यांची ग्रोथ अवघ्या जगाला लाजवणारी आहे. त्याच अंबानींच्या कंपनीने आता IMG global कंपनीचा हिस्सा 52.8 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

याबाबत शेअर बाजाराला रिलायन्स कंपनीने माहिती दिली आहे. त्यानुसार आता आईएमजी वर्ल्डवाइड एलएलसी यासह आईएमजी-रिलायंस लि. (आईएमजी-आर) ही कंपनी अंबानींनी स्थापन केलेली आहे. आता यातील आईएमजी वर्ल्डवाइड एलएलसी यांचा हिस्सा रिलायंसने घेतला आहे.

2010 पासून ही कंपनी कार्यरत आहे. सुमारे 30 देशात काम करणारी ही कंपनी स्पोर्ट्स, इव्हेंट मॅनेजमेंट, फॅशन यामध्ये कार्यरत आहे. आईएमजी सिंगापुर पीटीई लि. यांच्याकडे यातील 50 टक्के वाटा होता. अंबानींनी त्याचे अधिग्रहण केले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here