शेतकरी आंदोलनाबाबत ठोस निर्णय न घेता उलट-सुलट प्रतिक्रिया देऊन भाजपने एकूनच आंदोलन बदनाम केल्याची टीका होत आहे. अशावेळी आज राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी नावाच्या पक्षाने भाजपची साथ सोडली आहे. तसेच आणखी एका माजी खासदाराने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
पंजाबमधील माजी लोकसभा खासदार हरिंदरसिंह खालसा यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. कृषी कायद्यांचे नियमन करणारी बाजारपेठ बंद पडून सरकार एमएसपीमध्ये गहू आणि तांदूळ खरेदी बंद करेल, असे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दिल्लीच्या सिंगू आणि टिकरी सीमेसह सीमेवर महिनाभरात हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आपण परत जाणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हे कायदे सप्टेंबरमध्ये संसदेत मंजूर करण्यात आले होते.
हे आंदोलन महिनाभर सुरू आहे. खालसा यांनी 2014 मध्ये पंजाबमधील फतेहगढ साहिबमधून लोकसभा निवडणूक आम आदमी पक्षाच्या तिकिटावर जिंकून नंतर 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यामुळे ते पक्ष सोडून गेले होते, असे एनडीटीव्ही इंडिया यांच्या बातमीत म्हटले आहे.
त्याच हरिंदरसिंह खालसा यांनी आता शेतकरी आंदोलनास पाठींबा देताना भाजप पक्षही सोडला आहे. एकूणच भाजपला आता अनेक झटके बसण्यास सुरू झालेले आहे. मात्र, तरीही भाजप पाठीमागे न हटता कायदे लागू करण्यासाठीचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
संपादन : सचिन पाटील
- राज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल
- आता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा
- आता घराचे स्वप्न होणार साकार; ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त लोन
- ‘या’ जगप्रसिद्ध कंपनीची भारतात होणार एंट्री; 5 राज्यात मैन्युफैक्चरिंग प्लांटसाठी चर्चा
- ‘करामती बल्ब’ असल्याचे सांगत ठगांनी दिल्लीतील व्यापार्याला 9 लाखाला घातला गंडा; ‘असा’ घडला प्रकार