मोदींच्या भाजपला झटका; आंदोलक शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी ‘त्यांनी’ सोडली साथ

‘एकाला चलो रे’चा नारा देतानाही सुमारे 15 पक्षांची राजकीय मोट बांधून भाजपने देशातील सत्ता मिळवली आहे. मात्र, आता शेतकरी आंदोलनात या पक्षाने आणखी एक मित्रपक्ष गमावला आहे.

अगोदरच अकाली दल या पक्षाने कृषी सुधारणा विधेयकातील जाचक नियमांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याकडे लक्ष वेधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपची साथ सोडली आहे. त्यात महिनाभर हे आंदोलन चालू असूनही सरकारने शेतकऱ्यांची दखल घेतली नाही.

(1) ANI on Twitter: “I have left the NDA (National Democratic Alliance) in protest against the three farm laws. These laws are anti-farmer. I have left NDA but won’t forge alliance with Congress: Rashtriya Loktantrik Party chief Hanuman Beniwal https://t.co/luToWGTwa7” / Twitter

उलट शेतकरी आंदोलनास बदनाम करण्याचा डाव भाजपची आयटी टीम आखत असल्याचे आरोप होत आहेत. आंदोलकांना चीनी, पाकिस्तानी, खलिस्तानी आणि नक्षलवादी ठरवून अपप्रचार केला जात आहे. हेच पाहून आणखी एका पक्षाने भाजपची साथ सोडली आहे.

राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी नावाच्या पक्षाने भाजपची साथ सोडली आहे. पक्षाचे नेते हनुमान बेनीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. शेतकरी विरोधी कायद्यावर भाजप सरकार ठाम असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देऊन शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here