हे विनोद वाचून नक्कीच पोट धरून हसाल..!

१)
एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तीच पुसून टाकली
आणि माणसाला विचारले,”काही आठवते का?”

माणूस: हो, फक्त बायकोचे नाव.

देव हसला अन म्हणाला,
सगळा फॉरमॅट केला पण वायरस गेला नाही.

२)
गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल, तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?

बंड्या : एकही नाही.
कारण, ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते. तिघिजनी मिळून फक्त गप्पा मारतील.

३)
बायको: माझी एकअट आहे!
नवरा : काय?
बायको: तूम्ही या दिवाऴीत सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार.
नवरा: माझी पण एक अट आहे?
बायको: काय?
नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?

४)
पती सोफ्यावर आडवा पडला होता.

पत्नीने त्याच्या डोक्यात दंडुका मारला.

पती: का मारलीस यार !

पत्नी: तुमच्या खिशात एक चिठ्ठी सापडली .तिच्यावर रेशमा असे लिहिले होते.

पती: अगं ती रेसची घोडी आहे. कालच्या रविवारी मी रेस खेळायला गेलो होतो ना!

पत्नी: सॉरी.

चार दिवसांनंतर पती घरी येताच त्याच्या डोक्यात पुन्हा दंडुका बसला.

पती: आता का मारलीस ?

पत्नी: घोडीचा फोन आला होता.

५)

बायको : पाहुणे येणार आहेत, घरी फक्त डाळच आहे.

नवरा : तू एक काम कर, किचन मध्ये एक भांडं पाड,
मग म्हण “अरे देवा, पुलाव सांडला” नंतर,
दुसरं भांडं पाड आणि म्हण “अगं बाई,
बिरयाणी सांडली” मग,
मी पाहुण्यांना सांगीन आज डाळ भात खाऊ..

पाहुणे येतात.
किचन मधून भांडं पडल्याचा आवाज येतो.

नवरा “काय झालं???”
बायको : आईच्या गावात..डाळच पडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here