त्यामुळे अटलजींच्या गाववाल्यांनी भाजपविरोधात पुकारला एल्गार; वाचा नेमके काय आहे कारण

आपल्या गावातून एखादा मोठा नेता झाला की सगळ्यांना विकासाचे स्वप्न पडते. वास्तवात सरकारकडे पाठपुरावा करून विकासासाठी हाच एकमेव मार्ग असल्याने मग त्यासाठी कार्यवाहीही केली जाते. मात्र, फ़क़्त घोषणाबाजी होते आणि वास्तवात नाहीही विकास होत नाही. असेच चित्र दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या गावाचे आहे.

त्यांचे गाव उत्तरप्रदेश राज्यात आहे. त्या राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी या गावाच्या विकासाचा आरखडा तयार करून भाजप सरकारने 14 कोटी रुपयांचा आराखडा जाहीर केला होता. आता एक वर्ष झाल्यावर त्यातील बहुसंख्य कामे सुरू झालेली नाहीत किंवा जी सुरू झाली होती तीच बंद करण्यात आलेली आहेत.

बटेश्वर (बाह, आग्रा) असे त्यांच्या गावाचे नाव आहे. बाह येथे नवीन जिल्हा स्थापन करावा आणि बटेश्वर गावाचा विकास व्हावा यासाठीची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे आता येथील ग्रामस्थांनी भाजप सरकारच्या अकार्यक्षम कारभाराच्या विरोधात तीव्र नाराजी आहे.

25 डिसेंबर ही अटलबिहारी यांची जयंती आहे. यंदा 97 वी जयंती होती. तर, मागील वर्षी या गावाच्या विकासासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली होती. मात्र, नंतर पुढे काहीही झालेले नाही. उलट 25 तारखेला काही कामांचे उद्घाटन होणार होते. तेही राज्य सरकारने स्थगित केले आहे. त्यामुळे या गावासह परिसरातील गावांनी भाजप सरकारच्या विरोधात बंद पुकारला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here