भाजपनेच दिला आपल्या बड्या मित्रपक्षाला झटका; केले मोठे राजकारण, घडला ‘हा’ प्रकार

दिल्ली :

दिवसेंदिवस भाजप बेभरवशाचा पक्ष बनत चालला आहे. भाजपपासून त्यांचे अनेक जुने मित्रपक्ष दुरावले आहेत. ही सुरुवात शिवसेनेपासून झाली आणि त्यानंतर एकेक करत जवळपास 5 राज्यातील 5 मोठे मित्रपक्ष भाजपपासून दुरावले आहेत. आता अशातच भाजपने अजून मोठे राजकारण करत आपल्या जवळच्या मित्रपक्षाला धक्का दिला आहे.

बिहारमध्ये मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानंच जनता दल युनायटेडला अरुणाचल प्रदेशमध्ये मोठा झटका दिला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं जदयूचे 6 आमदार फोडले आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशात जदयुचा आता केवळ एकच आमदार शिल्लक राहिला आहे. एनडीएमधील आपला सहकारी पक्ष असलेल्या जदयूला भाजपने मोठा गेम केलं आहे.

याशिवाय, पीपुल्स पार्टी ऑफ अरुणाचल(पीपीए) चे लिकाबाली मतदारसंघातील आमदार करदो निग्योर यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. पंचायत व महापालिका निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर घडलेल्या या प्रकारामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

यावर बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे राष्ट्रीय अध्यक्ष नीतीश कुमार यांनी मात्र मौन धारण केलं आहे. त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असे असले तरी याचा फटका भाजपला बसणार आहे, असे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.   

संपादन : स्वप्नील पवार   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here