सोडा ‘या’ पाच सवयी; वाचा, आयुष्य आनंदाने जगण्याचा फॉर्म्युला

आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर फार काही जगाच्या आक्रीत करायची गरज नसते. आयुष्यात काही छोट्या गोष्टी करायला सुरू करा. तुमच्या जीवनात आनंद आपोआप येईल.

1) नशा ही अशी गोष्ट आहे की जी केल्यावर माणसाला काय वाईट काय चांगले याची कल्पना राहात नाही. त्यामुळे नशेत असणारा माणूस खदखद व्यक्त करायच्या नादात कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांना त्रासदायक ठरतो. त्यामुळे नशेपासून दूर राहने अति उत्तम.

2) माणसाने काम करावे त्याबदल्यात त्याच्या मोबदला मिळवावा पण काम कमी आणि मोबदला जास्त असा मोह करणे हे वाईट आहे. कारण माणसाला कष्टाच्या पैशाची किंमत असते. फुकटात मिळालेल्या पैशाची किंमत नसते म्हणून माणसाला वाईट सवयी लागू शकतात. त्यामुळे मोह बाळगू नये.

3) रागीट व्यक्ती हा शक्यतो यशस्वी नसतो. कारण रागीट माणसे ही रागात चुकीचा निर्णय घेतात. परिणामी त्यांना घेतलेला निर्णय निस्तारण्यातच सगळं जात. त्यामुळे रागीट स्वभाव सोडून द्यावा.

4) जसे अति राग घातक आहे तसेच अति प्रेम सुद्धा घातक आहे. अति प्रेम हे दगाबाज ठरू शकते. अति प्रेम तुमच्या विश्वासाला तडे देऊ शकते. अति प्रेमामुळे माणसे अनेक अयोग्य निर्णय घेत असतात.

5) कुठल्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अगदी ग्रंथात सुद्धा सांगितले आहे की जो अहंकारी आहे तो कधीतरी संपतोच.

अहंकारी असण्यामुळे आपल्या जवळचे लोक आपल्याला प्रिय नसतात. अहंकार आपल्या बोलण्या वागण्यात दिसत आसतो. अहंकारी लोक स्वतःच्या हाताने नष्ट होतात जसे की रावण आणि दुर्योधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here