आयुष्यात पुढे चालताना ‘या’ गोष्टी नक्कीच घ्या लक्षात

  • आपले सत्य-स्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते
    व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागतात.
  • स्वतःचा विकास करा.
    ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
  • दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात
    आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात.
  • प्रयत्न करत राहा कारण
    अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत.
  • अपयश म्हणजे संकट नव्हे,
    आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
  • अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
  • आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत.
    त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे.
  • वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
    वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
  • सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.
    ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.
  • आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात.
    मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here