ब्रेकिंग : ‘त्या’ तारखेला पुणे-नगर महामार्ग राहणार बंद; वाचा अत्यंत महत्वाची माहिती

पुणे :

देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे सध्या सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर सगळीकडे प्रशासन काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान आता एक मोठी  

बातमी समोर आली आहे. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्ताने पुणे महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केले जात आहे की, 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. पण कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे लोकांनी यंदाच्या वर्षी घरातूनच अभिवादन करावे.

मात्र आता  पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी गर्दी न होण्यासाठी मोठे आदेश काढले आहेत. पुणे-नगर महामार्ग बंद राहणार असला तरीही या मार्गावरील वाहतूक 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे 1 जानेवारी रोजी देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे. मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here