आता सकाळ-संध्याकाळ जोरदार गारवा जाणवत आहे. अशा वातावरणात शरीर थंड पडत असते. तसेच अजून कोरोनाचे संकटही पुर्णपणे संपलेले नाही. हिवाळा म्हणजे साथीच्या रोगांचा काळ असतो, त्यामुळे या काळात शरीराची उष्णता संतुलित ठेवावी लागते.
ही थंडी बोचरी असते ज्यामुळे कडाक्याच्या थंडीत फक्त सर्दी-पडसं, खोकला, ताप अशाच समस्या उद्भवत नाहीत तर रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. म्हणूनच आता आपल्या शरीराला उष्णता आणि रोगप्रतिकारक शक्ती देणारे पदार्थ गरजेचे आहेत. जाणून घ्या या पदार्थांविषयी :-
- मध आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसेच शरीराला आतून उष्ण ठेवते. मधात अॅंटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे इतर गंभीर आजारांना दूर ठेवते. म्हणून मध किंवा मध घातलेला काढा घेणं थंडीच्या दिवसांत अत्यंत लाभदायक असतं.
- तूप आपल्या शरीराचे तापमान व गरमी नियंत्रित करण्यासाठी मदत करते. तूप आपल्याला शरीरास पोषक घटक आणि ऊर्जा देते म्हणून हिवाळ्यात तुपात तयार केलेले विविध प्रकारचे लाडू, हलवा, शिरा, उपमा असे पदार्थ खाणं लाभदायक ठरु शकतं.
- थंडीच्या दिवसांत शरिरातील रक्तप्रवाहाची गती कमी होते, नसा आकसतात त्यामुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो तसेच साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी गुळ लाभदायक ठरतो. घसा आणि फुफ्फुसातील संक्रमाणापासून वाचण्यासाठीही गुळाचे सेवन करणे फायद्याचे असते.
- तीळ हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवतात व कडाक्याच्या थंडीपासून आपला बचाव करतात.
- आल्यामुळे शरीराला आतून गरमी मिळते तसेच सर्दी-पडसं, खोकला व ताप यासारखे आजार दूर होतात. खवखवणा-या घशासाठी आलं रामबाण उपाय असतं.
संपादन : संचिता कदम
- ‘या’ बँकेचा ग्राहकांना अलर्ट! 1 फेब्रुवारीपासून नाही काढता येणार ‘या’ ATM मधून पैसे
- फायद्याची माहिती : म्हणून महाराष्ट्रालाही गरज आहे भावांतर योजनेची; वाचा योजनेचे वैशिष्ट्ये
- ‘त्या’ ई-कॉमर्स वेबसाइटची भन्नाट ऑफर: अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत मिळतोय टीव्ही; स्मार्टफोनवरही 40% डिस्काउंट
- मोठी बातमी : पशूसंवर्धन मंत्र्याचे आव्हान; बर्ड फ्लूमुळे कोणी व्यक्ती दगावल्याचे दाखवून द्या आणि…
- म्हणून पंजाबी शेतकरी आहेत श्रीमंत; पहा कशासाठी नेमके त्यांचे आंदोलन चालू आहे ते