मोठी बातमी… ED ची कारवाई! कृषी कर्ज घोटाळा प्रकरणात ‘त्या’ पक्षाच्या आमदाराला झटका; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता जप्त

परभणी :

ED ने मोठी कारवाई करत तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी ED कडे तक्रार केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. त्यामुळे रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना मोठा धक्का बसला आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर अँड एनर्जी, योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलर पॉवर लिमिटेडच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या तीनही कंपन्यांविरोधात मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. सदर प्रकरण हे 2012-13 ते 2016-17 दरम्यानचे आहे.  

काय आहे प्रकरण :-

गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड हा आमदार रत्नाकर गुट्टे यांचा साखर कारखाना आहे. या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेतले गेले. नंतर सक्तवसुली संचालनालयाकडे ही तक्रार आली. अखेर सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई करत अनेक मालमत्ता जप्त केल्या.   

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here