बिनविरोध निवडणुकीचे हेही आहेत तोटे; राजकारणावर होतो ‘असा’ परिणाम

सध्या चाललेल्या अहमदनगर जिल्ह्यातील बिनविरोध निवडणूक प्रकरण म्हणजे सरळ सरळ मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जातोय

ही चिंतेची बाब आहे. दुर्दैवाने कोणत्याही राजकीय पक्षाने हे प्रकरण अद्याप उचलून धरले नाही

ज्या गावात बिनविरोध निवडणूक झाली त्या गावातील मतदारांचे काय ? त्यांना आपले कारभारी मतपेटीतून निवडण्याचा हक्क नाही का ?

बाकी गावातील दोन विरोधक एकत्र येणार सत्ता स्थापन करणार

विकास कामांच्या नावाखाली एकत्र ‘मलिदा’ खाणार ?

नवे नेतृत्व समोर येवूच नाही हाच खरा प्लान दिसतोय

स्पष्ट सांगायच झाल तर ज्या गावात बिनविरोध निवडणूक होईल त्याच गावाला निधी मिळणार …

आता ‘नेते’ निधी देणार म्हणजे पाच वर्षानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते मतदानरुपी ‘लीड’ ने वसूल करणार ?

विरोधकांचे काय ? त्यांनी वर्षोनुवर्षे माजी आमदार/ पराभूत म्हणूनच रहायचं का ?

अगदीच गाव पातळीवर हे ठीक आहे उद्या हेच इतर निवडणुकीत ही झाले तर ???

लेखन व संपादन : तेजस शेलार (संपादक, अहमदनगर लाईव्ह 24)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here