धक्कादायक : नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ‘एवढ्या’ जणांना एकाच वेळी कोरोनाची लागण

नाशिक :

ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती सापडल्याने तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. जगभरात पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे. देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव पसरताना दिसतोय. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ११८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस, प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

या मोठ्या घटनेमुळे आता पोलिस आणि जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात तीन महिन्यांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.       

आता पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ११८ जणांना नाशिकच्या ठक्कर डोम कोविड सेंटरमध्ये सगळ्या कोरोना बाधितांना दाखल करण्यात आले आहे. महापालिका प्रशासन, राज्य सरकार यांच्याकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यूही लावण्यात आला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here