धक्कादायक : इंग्लंडहून महाराष्ट्रातील ‘त्या’ शहरात आलेला तरुण करोना पॉझिटिव्ह; ‘त्या’ भीतीमुळे खळबळ

नागपुर :

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने वाढताना दिसत आहे. काही देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन केला जात आहे. अशातच ब्रिटनमध्ये सापडलेल्या करोनाच्या नवा ‘स्ट्रेन’मुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ग्लडहून नागपुरात आलेला तरुण करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या तरुणाच्या शरीरात नवीन स्ट्रेन असल्याचा अंदाज आहे. 

या वृत्तामुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने सगळीकडे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अद्याप तो कोरोना व्हायरस कोणता, हे लक्षात आले नसले तरीही नागपुरसह महाराष्ट्रात चिंता वाढली आहे. बाधित तरुणावर उपचार सुरु असून त्याचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

अशी झाली घटना :-

कोरोनाबाधित असलेला हा तरुण भारतात उतरल्यानंतर विमानतळावर त्याची करोना चाचणी केली गेली. त्यावेळी त्याची चाचणी निगेटीव्ह आली. नंतर २९ नोव्हेंबरला तो नागपुरात आला होता. पुढच्या काहीच दिवसात त्याला कोरोनाची लक्षणे जाणवली. अखेर १५ डिसेंबरला त्याने पुन्हा चाचणी केली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली.

दरम्यानच्या काळात हा तरुण कोणाकोणाच्या संपर्कात आला आहे, त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. प्रशासन पुन्हा एकदा जोरात कामाला लागले आहे. प्रशासनालाही संपर्कात असणार्‍या लोकांचा शोध घेताना अजून एक मोठी माहिती मिळाली आहे. इंग्लंडमधून आल्यानंतर हा तरुण नागपूरसह गोंदियात अनेकांच्या संपर्कात होता.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here