म्हणून दिल्लीच्या ‘त्या’ भागात मोठा पोलीस बंदोबस्त; राहुल गांधी झाले बैचेन..!

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून कॉंग्रेस पक्षाने देशभरातील 2 कोटी लोकांच्या स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपतींना देण्याची तयारी केली आहे. आज असे निवेदन दोन ट्रक भरून देण्यात येणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी कलम 144 लावून सगळ्या राजकीय आंदोलनास जाम करून टाकले आहे.

24 अकबर रोड या भागातील काँग्रेस मुख्यालयात सकाळीच राहुल गांधी आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित झाले होते. मात्र, पोलिसांनी दिल्लीच्या या भागासह राष्ट्रपती भवनावरील रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे राहुल गांधी बैचेन झालेले आहेत.

चाणक्‍यपुरी येथील एसीपी प्रज्ञा यांनी ANI वृत्तसेवा यांना म्हटले आहे की, फ़क़्त तिघांना राष्ट्रपती भवनामध्ये जाण्यास परवानगी आहे. त्यामुळे आज काँग्रेस पक्षाचे आंदोलन होणार की नाही याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here