म्हणून लस बनवताना वापरतात डूक्कराची चरबी; वाचा महत्वाची माहिती

सध्या करोना विषाणूच्या दोन वेगवेगळ्या घातक स्ट्रेनबाबत भीतीदायक चर्चा सुरू असतानाच आणखी एक चर्चा वेगाने फैलावली आहे. तो विषय आहे ही लस बनवताना डूक्कराची चरबी वापरली आहे किंवा नाही हा..! मात्र, लस बनवताना याच प्राण्याची चरबी वापरावी असाही नियम नाही, असे संशोधकांनी म्हटलेले आहे.

होय, धर्म हा जीवनाचा आधार असल्याचे मानणाऱ्या अनेकांनी या चरबीच्या वापरामुळे बनवलेली लस घेतल्यास हराम असल्याचे म्हणण्यास सुरुवात केली आहे. एकूणच त्यामुळे करोना लसीकरण हा पुन्हा एकदा वादाचा मुद्दा बनला आहे. मात्र, लस बनवताना अशा पद्धतीने पोर्क जिलेटीन वापरले नसल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.

लसचे स्टॅबिलायझर म्हणून त्यात वेगवेगळी चरबी वापरली जाते. त्याच मुद्द्यामुळे सध्या करोना विषाणूची लस चर्चेत आलेली आहे. यहुदी आणि मुस्लीम धर्मियांनी ही लस न घेण्याचे आवाहन सुरू केल्याच्या बातम्या आहेत. यापूर्वीही अशाच पद्धतीने अनेकदा पोर्क जिलेटीन वापरलेल्या लस न घेण्याचे आवाहन या धर्मियांनी वेळोवेळी केलेले आहे. मात्र, आता अजूनही कोणत्याही धर्मगुरूने यावरून नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही.

Pfizer, Moderna आणि AstraZeneca या कंपन्यांनी जाहीर केले आहे की, या लसच्या बनवण्याच्या पद्धतीत कुठेही डुक्कर प्राण्याची चरबी वापरलेली नाही. ‘Novartis’ यांनीही यापूर्वी अशी चरबी न वापरता मैनिंजाइटिस लस बनवल्याचा इतिहास आहे. तसेच संयुक्‍त अरब अमीरात यांच्या फतवा काउंसिल यांनी लस वापरण्याची गरज व्यक्त केली आहे. तर, सिडनी विश्वविद्यालय येथील प्राध्यापक डॉक्टर हरनूर राशिद यांनी म्हटले आहे की, लस न घेणे हेही जास्त धोकादायक आहे. त्यामुळे धर्माचा अडसर न ठेवता ही लस सर्वांनी घेणे आवश्यक आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here