‘अशी’ ओळखा तुपात होणारी भेसळ; वाचा महत्वाची माहिती

सध्या विविध खाण्याच्या पदार्थात भेसळ करण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच विविध घातक पदार्थ मिसळून बनवलेले बनावट तूप पकडले गेले असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यापूर्वी आपल्याकडे घरीच तूप ब्ंनवण्याची पद्धत होती मात्र आता बदलत्या जीवनशैलीमुळे आपण तूप हे बाहेरून विकत घेऊ लागलो. परिणामी यात भेसळ वाढली. त्यामुळे आज आम्ही आपल्याला शुद्ध आणि भेसळ असणार्‍या तुपाची ओळख कशी पटवायची याविषयी सांगणार आहोत.

  1. एका भांड्यामध्ये एक चमचा तूप गरम करत ठेवा. जर तूप लगेचच वितळलं आणि त्यास गडद तपकिरी रंग आला तर हे तूप शुद्ध आहे.

तसंच जर तूप वितळण्यास वेळ लागत असल्यास आणि त्यास हलका पिवळा रंग आल्यास तूप भेसळयुक्त आहे, हे लक्षात घ्यावे.

  • आपल्या हातावर एक चमचा तूप घ्या आणि थोड्या वेळाने ते आपोआप विरघळू लागल्यास तूप शुद्ध आहे, हे समजून जा.

तूप हातावर रगडल्यानंतरही घट्ट होत असेल आणि त्यास कोणत्याही प्रकारचा सुगंध येत नसेल तर तूप भेसळयुक्त आहे.

  • भेसळयुक्त तूप ओळखण्याची आणखी एक पद्धत. तुपामध्ये थोडेसे आयोडीन सोल्युशन मिक्स करा. यानंतर आयोडीन सोल्युशनचा रंग बदलल्यास तुपामध्ये स्टार्चची भेसळ करण्यात आलेली आहे.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here