यहुदी, मुस्लिमांमध्ये संभ्रम; करोना लसमध्ये ‘ती’ चरबी असल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू

यहुदी अर्थात ज्यू धर्मीय आणि मुस्लीम धर्मियांच्या धर्मगुरू आणि नागरिकांमध्ये सध्या करोना विषाणूवरील लसमध्ये डूक्कराची चरबी वापरली आहे किंवा नाही आणि वापरली असल्यास अशा लस टोचून घ्याव्यात किंवा नाहीत यावरून चर्चा सुरू झालेली आहे. त्याबाबतीत संभ्रम निर्माण झाल्याने एकूणच लसीकरणाची प्रक्रिया धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

अरबस्तानातील मूळ असलेल्या या दोन्ही धर्मीयांमध्ये डुक्कराचे मांस सेवन हे हराम मानले जाते. त्यामुळे कट्टर धार्मिकता असलेल्यांना या प्राण्याचे नाव घेणेही शक्य होत नाही. त्यामुळेच लसमध्ये डुक्कर या प्राण्याची चरबी असलेला पोर्क जिलेटीन याच्या वापराच्या बातम्या आल्याने आता करोना विषाणूची लस चर्चेत आलेली आहे.

‘ऑर्थोडॉक्स’ यहुदी आणि मुस्लीम धर्मीय जगभरात पसरलेले आहेत. त्यांच्यामध्ये यावरून चर्चा सुरू झालेली आहे. मात्र, या दोन्ही धर्मातील प्रमुख व्यक्तींनी याबाबतीत म्हटले आहे की, याद्वारे चरबीचे सेवन केले जात नाही. त्यातही पर्याय नसेल तर अशा पद्धतीने बनवलेली लस घेण्यात कोणत्याही अडचणी असू शकत नाहीत. मात्र, तरीही काहींनी यावरून धर्माचा मुद्दा आणून विरोधाची भाषा येऊ शकते अशी शक्यताही व्यक्त केली आहे.

नवभारत टाईम्स यांनी याबाबत स्पेशल फिचर प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या दोन्ही धर्मासह अनेकांमध्ये यावरून चर्चा सुरू झालेली आहे. इंडोनेशिया देशातून या चर्चेला सुरुवात झालेली आहे. चेचक आणि रुबेला या विषाणूवरील लसमध्येही अशाच पद्धतीने पोर्क जिलेटीन वापरल्याच्या बातम्यांमुळे 2018 मध्ये चर्चा झाली होती. पुढे जगण्याचा प्रश्न असल्याने आणि हे खाण्याचे घटक नसल्याने मग जगभरात दोन्ही विषाणूच्या लस देण्यात आलेल्या होत्या. आताही असाच वाद आहे. मात्र, तो निवळण्याची शक्यता आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here