सावधान : झटपट कर्जाच्या बाबतीत RBI ने दिल्या ‘त्या’ सूचना; पहा तुम्ही तर याला बळी पडलेला नाहीत ना..!

सध्या या माध्यमातून झटपट कर्ज घ्या, त्याद्वारे मिळवा कर्ज आणि व्याजदरावर सूट असल्या ऑफर जोरात आहेत. मात्र, असल्या नोंदणीकृत नसलेल्या आणि मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या कंपन्यांबाबत रिझर्व बँकेने एक आवाहन प्रसिद्ध केले आहे.

आरबीआयने  डिजिटल प्लेटफॉर्म्स (digital lending platforms) और मोबाइल ऐप (mobile app) यांच्यामार्फत कर्ज घेताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यात म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीला किंवा अशा पद्धतीने कर्ज वाटप करण्याचा दावा करणाऱ्यांना आपली माहिती आणि कागदपत्र देऊन नयेत. यामुळे फसवणूक होऊ शकते.

याद्वारे मिळणारे कर्ज वास्तवात जास्त व्याजदरावर असू शकते किंवा अनेकदा तर आपल्या कागदपत्राच्या आधाराने वेगळेच कर्जही घेतले जाऊ शकते. अशा पद्धतीने फसवणूक झाल्यास किंवा तशी शक्यता वाटल्यास https:achet.rbi.org.in या वेबसाईटवर तक्रार नोंदण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here