धक्कादायक : आणखी घातक करोनाही आला; एकाच आठवड्यात सापडला दुसरा डेंजर स्ट्रेन

करोना नावाच्या विषाणूने अवघे जग लॉकडाऊन करून टाकले आहे. अशावेळी आता लस येणार आणि आपण सगळे या संकटातून मुक्त होणार असे वाटत असतानाच धक्कादायक अशी बातमी येऊन धडकली आहे.

होय, करोनाचा एक स्ट्रेन आल्याने युरोप लॉकडाऊन होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना त्यामुळे भारत सरकारने रेड सिग्नल दिला होता. आता त्याच ब्रिटन देशात आणखी दुसराही डेंजर स्ट्रेन येऊन दाखल झाला आहे.

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मैट हैनक यांनी याबाबत अधिकृतरीत्या माहिती दिली आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, याबाबतचे फ़क़्त 2 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आफ्रिका खंडातून युरोपात आलेल्या सर्वांना तातडीने विलगीकरण करून राहण्याचे सूचित करण्यात आलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here