अमेरिकेसह इतर प्रगत देशांच्या धर्तीवर अंतराळ संशोधन क्षेत्रात खासगी गुंतवणूक करण्याला भारत सरकारने हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे या सेक्टरमध्ये आपलीही झेप उंचावण्यासाठी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.
स्पेस रेग्युलेटर IN-SPACe (Indian National Space Promotion and Authorisation Centre) यांच्याकडे अमेझॉन कंपनीसह 22 कंपन्यांनी या क्षेत्रात काम करण्याची रुची असल्याचे प्रस्ताव दिलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला स्पेस हब बनवण्याचे स्वप्न ठेऊन IN-SPACe ची स्थापना केली आहे. पहिल्याच टप्प्यात त्यास कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
अमेझॉन कंपनीसह ब्रिटनच्या भारती ग्रुप यांची OneWeb, एल एंड टी, यूएई देशातील Archeron Group, नॉर्वे देशातील Kongberg Satellite Services (KSAT), टाटा NELCO आदि कंपन्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. एकूणच देशात पुढील काळात अनेक नव्या कंपन्या स्पेस सेक्टरमध्ये आपले नाव आणि नशीब काढतील असेच चित्र आहे.
एकूणच देशातील अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो यांना यामुळे मोठी मदत होईल. गुंतवणूक वाढल्याने या क्षेत्रात नवीन रोजगार संधी उपलब्ध होतील.
संपादन : सचिन मोहन चोभे
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने