सलग दुसर्‍या दिवशी सोन्याच्या दरात ‘असे’ झाले बदल; वाचा, काय आहेत ताजे दर

दिल्ली :

आता उत्सवाचा हंगाम सुरु असून आता सोने खरेदी वाढली आहे, असे चित्र आहे. अशातच सोने-चांदीचे दर कमी- जास्त होताना दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीच्या भावात बदल झालेला दिसून येत आहे.

गेल्या 5 दिवसांपासून सोन्या चांदीचे दर सतत वाढत होते. काल मात्र त्याला ब्रेक लागला.  आजही सोन्याच्या भावात घसरण झाली असून या घसरणीनंतर सोन्याचे दर 50047.00 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. तर चांदीच्या दरातही 143.00 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर चांदी 66728.00 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होती.

सोन्याचांदीच्या आंतरराष्ट्रीय किंमतीमध्ये घसरण झाल्यामुळे भारतीय बाजारात देखील त्याचा परिणाम पाहायला मिळाला, अशी माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हाइस प्रेसिडेंट (कमोडिटीज) नवनीत दमानी यांनी दिली.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here