‘त्या’ हीरोमुळे फेमस झाली होती ‘ही’ बॉबी बाईक…!

ओळखलं का बाईकला, जुन्या जमान्यातली सगळ्यात फेमस बाईक. अर्थात आजही ती रस्त्यावर दिसत नसली तरी तिचे चाहते अनेक आहेत. ही आहे राजदूत जीटीएस-175′. आजकाल शेवटची राजदूत म्हणून आपल्याला डाव्या बाजूने किक आणि गियर असलेली राजदूत कुठे तरी दिसते. एखादा शेतकरी किंवा दूधवाला यांच्याकडे ती असते.

माहिती आहे का ही राजदूत एवढी फेमस का झाली?
1970 च्या दशकात ऋषी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचवेळी ही राजदूत सुद्धा मार्केटमध्ये आपली नशीब आजमावत होती. त्यावेळी ऋषी कपूर यांनी ही बाईक आपल्या चित्रपटात वापरली म्हणून ही बाईक फेमस झाली. मग हिला बॉबी राजदूत अस नाव मिळालं. आजही हिला अनेक जण फक्त बॉबी या नावाने ओळखतात.

या गाडीचे मार्केट उचलन्यात ऋषी यांचा मोलाचा वाटा होता. आता ही राजदूतही आपल्या मनात आहे आणि ऋषी कपूरही. पण खऱ्या आयुष्यात मात्र कुठेच नाही.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here