बाबो… ‘रिपब्लिक भारत’ला मोठा झटका; भरावा लागणार ‘एवढा’ दंड, घडला ‘हा’ प्रकार

मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत असणार्‍या ‘रिपब्लिक भारत’ या वृत्तवाहिनीला मोठा झटका बसला आहे. या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनाही एका मोठ्या प्रकरणात अटक झाली होती. आता अरेरावीपणा, द्वेष पसरवणाऱ्या भाषेचा वापर अशा विविध कारणांमुळे या चॅनलला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

ब्रिटीश ब्रॉडकास्टींग रेग्युलेटर या ब्रिटन येथील संस्थेने आधीच अडचणीत असलेल्या रिपब्लिकन भारतला दंड ठोठावला आहे. २० हजार पौंड ही दंडाची रक्कम आहे. संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिपब्लिक वृत्तवाहिनीने ‘पुछता है भारत’ या कार्यक्रमात द्वेष पसरवणारी भाषा वापरण्यात आली आहे. कार्यक्रमात वापरण्यात आलेली भाषा अतिशय अपमानजनक असून नियम २.३, ३.२, आणि ३.३ चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ‘वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क लिमिटेड’च्या विरोधात  आदेश जारी केला गेला,

नेमक काय होते ते वादग्रस्त वाक्य :-

  1. सदर कार्यक्रमात सामान्य पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी, माकडे, भिकारी, चोर असे संबोधण्यात आले. 
  2. गोस्वामी यांनी या कार्यक्रमात पाकिस्तानचे शास्त्रज्ञ, डॉक्टर, नेते, खेळाडू सर्वजण आणि तेथील प्रत्येक लहान मूल दहशतवादी आहे असे विधान केले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here