बापरे… ‘त्या’ सिनेमाच्या सेटवर सापडले 8 कोरोनाबाधित; ‘या’ दिग्गज अभिनेत्याला व्हावं लागणार क्वारंटाइन

मुंबई :

आता कोरोना पुन्हा वाढताना दिसतो आहे. काही देशांमध्ये कोरोनाचे थैमान पुन्हा वेगाने पसरत आहे. देशभरात आता सिनेमा, मालिकांचे शूटिंग चालू झालेले आहे. अन्नाथे या दक्षिणात्य सिनेमाच्या सेटवर तब्बल 8 जन कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या सेटवर दिग्गज अभिनेते रजनीकांतही होते. त्यामुळे आता थेट रजनीकांत यांनाही क्वारंटाइन व्हावं लागणार आहे.

आता मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आले असून चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आले आहे. रजनीकांतचे प्रवक्ते रियाज अहमद यांनी सांगितले की, चित्रपटाच्या सेटवर उपस्थित लोकांपैकी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. याच कारणास्तव, रजनी सर हैदराबादमध्ये स्वत:ला क्वारंटाइन करतील किंवा चेन्नईला परत येईल.

अनलॉकनंतर 14 डिसेंबरपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले होते. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये या सिनेमाचे शूटिंग चालू होते. शूट सुरू होण्यापूर्वी सन पिक्चर्स, प्रॉडक्शन हाऊसने चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली होती. रजनीकांत यांच्यासह त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतही त्यांच्यासोबत हैदराबादला आली होती.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here