‘संजीवनी’प्रकरणी मोदींच्या शिलेदाराला कोर्टाची नोटीस; वाचा नेमके काय आहे प्रकरण

‘ना खाने दुंगा’चा डंका असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षातील अनेक धुरीण आणि कार्यकर्ते भ्रष्टाचार प्रकरणात सापडत आहेत. अशावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात जल शक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटीच्या प्रकरणामुळे नोटीस आली आहे.

शेखावत यांच्यासह त्यांची पत्नी नोनद कंवर यांना राजस्थान उच्च न्यायालयाने नोटीस दिली आहे. राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी आमदारांच्या खरेदी-विक्री करण्याच्या प्रकरणात शेखावत यांच्यावर अनेकदा टीका आणि आरोप झालेले आहेत. त्यातच हे नवे प्रकरण जोडले गेल्याने देशभरात यावरून चर्चा तापली आहे.

1 लाख 46 हजार गुंतवणूकदारांचे सुमारे 1 हजार कोटी रुपये अडकलेल्या या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे. त्यासाठी शेखावत यांच्यासह 17 जणांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. हाईकोर्ट जस्टिस विजय विश्नोई यांनी ही नोटीस बजावली आहे. जीवनी पीड़ित संघ यांनी ही याचिका कोर्टात केलेली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here