चाळीशीत आहात… मग ‘या’ गोष्टी खाणे टाळा; अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ परिणाम

आहाराचा आणि वयाच्या संतुलन असलाच पाहिजे ते नसेल तर आपल्याला विविध रोगांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते त्याचा परिणाम मानसिक रित्या ही भोगावाच लागतो तारुण्यात बालपणात आणि चाळीशी पार करताना आपल्या सवयी सारख्याच असतात त्या खाण्याच्या असो अथवा पिण्याच्या.

आज आम्ही आपल्याला काही खाद्यपदार्थांची यादी सांगत आहोत ज्या आपल्याला 40 नंतर कमी कराव्या लागतील. जेणेकरून भविष्यात आपण अनेक धोकादायक आजारांपासून वाचू शकता. चला याची यादी पाहूया.

१) प्रामुख्याने चहा आणि कॉफी प्यायची टाळा. जर आपण 40 नंतरही जास्त चहा घेत असाल तर आपल्याला उच्चरक्तदाब, मायग्रेन, अपचन यासारख्या समस्यांचा सामना करावा लागेल. तसेच कॉफी पिल्याने झोपेची समस्या वाढू शकते.

२) रोजच्या आहारात योग्य मीठ घ्या. एखाद्यावेळी जर मीठ कमी पडले असेल तर वरून मीठ घेऊ नका. चाळीसी नंतर कमी मीठ खाणे हे कधीही चांगले.

३) जर आपणास मद्यपान करायची सवय असेल तर ते हळूहळू कमी करा. कारण मध्ये मद्यपानमुळे आपली विचार करायची क्षमता कमी होते, तसेच स्मृतिभ्रंश देखील होऊ शकतो.

४) सर्वात महत्त्वाचे म्हणजे हॉटेलचे खाणे टाळा. ते शक्य नसेल तर स्ट्रीट फूड आणि तेलकट खाणे 100% टाळा. अन्यथा आपल्याला आरोग्याच्या हजारो समस्यांना सामोरे जावे लागेल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here