नाविन्यपूर्ण : सफल शेतीचा मूलमंत्र म्हणजे ‘फसल’; मोबाईलवर कळणार पिकाचे आरोग्य..!

हवामानाच्या बदलाचे परिणाम, सॉरी दुष्परिणाम आता अवघे जग भोगत आहे. अशावेळी याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो शेतकऱ्यांना. कारण, खत, कीडनाशक आणि अस्मानी संकटामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे. त्याचवेळी बाजारातील भावाची कोणतीही शाश्वती नाही. याच समस्यांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारे एक खास उपकरण म्हणजे ‘फसल’..!

शेतकरी बंधू-भगिनींनो, आपल्या मोबाईलात आपल्या पिकाची माहिती आणि त्याला आरोग्यदायी ठेवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू एकाचवेळी समजावून सांगणारा हा फसल नावाचा नवा मित्र आलेला आहे. ऑटोमेटिक पद्धतीने आपल्याला मदत करणारा हा मित्र वोल्कस (wolkus) नावाच्या कंपनीने आणला आहे. शेतातील पिक आणि हवामानाची माहिती या दोन्हींच्या अनुषंगाने आपण पिक व्यवस्थापनात कोणती काळजी घ्यायची याचीच माहिती फसल नावाचे हे यंत्र तत्काळ देते.

यासाठी काही खास गोष्ट करावी लागते, किंवा काही अवघड गोष्टींच्या झंझटीत आपल्याला अडकावे लागते असे काहीही नाही. आपण फ़क़्त ग्राहक सेवा केंद्राला फोन करायचा आणि कंपनीचा प्रतिनिधी तुमच्या शेतावर येऊन हे उपकरण बसवून देईल. तसेच एका छोटेखानी ट्रेनिंगमध्ये आपल्याला याचा मोबाईलवर वापर कसा करायचा आणि त्याद्वारे कसा फायदा होऊ शकतो याचीही माहिती कंपनीचा प्रतिनिधी समजावून सांगेल. पाण्याच्या बचतीसह सर्व कृषी निविष्ठांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी हे फसल नावाचे उपकरण खूप उपयोगी आहे. डाळिंब, द्राक्ष, केळी, फळबागा, भाजीपाला, शेडनेट, ग्रीनहाउस यासह सर्वच पिकांसाठी शेतीमध्ये याचा उपयोग होतो.

आता तुम्ही म्हणाल, हे काय मोफत आहे होय? नाही, हे अजिबात मोफत नाही. या फसल नावाच्या मित्राला शेतात बसवून सफल शेतीचा मूलमंत्र अंगीकारण्यासाठी खर्च आहे अगदीच माफक. एकदा ‘फसल’ बसवले की त्यासमवेत सपोर्टही मोफत मिळणार आहे. यासाठी आपण अगोदर कोणतीही रक्कम द्यायची नाही. फ़क़्त फोन करून आपली गरज आणि नाव, पत्ता यासह संपर्क क्रमांक देऊन भेटीची वेळ सांगायची आहे. मग कंपनीचा प्रतिनिधी तुम्हाला येऊन शेतामध्ये भेटेल. आपल्याला जर हे यंत्र आवडले आणि त्याद्वारे पैशांची बचत आणि उत्पादनात वाढ करण्याची गरज पटली तरच आपण हे यंत्र तिथल्या तिथे बुकिंग करू शकता. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याला शेतात मग हे यंत्र बसवून देतील.

अधिक माहितीसाठी 7770012020 या मोबाईल नंबरवर कॉल करून किंवा आपले नाव, पत्ता, संपर्क नंबर आणि भेतीसाठीची वेळ कळवून ठेवा. कंपनीचा प्रतिनिधी थेट शेतात येऊन याबाबत माहिती, मदत आणि मार्गदर्शन करेल. तेही मोफत..!

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here