‘त्या’ तंत्रज्ञानाद्वारे करता येते हवामानाचे नियंत्रण, पण..; पहा कोणाकडे आहे ते पावसाचे तंत्रज्ञान

आपण शाळेत शिकतो की, गरज ही शोधाची जननी आहे. होय, अशाच पद्धतीने गरज किंवा इतरही सकारात्मक वा नकारात्मक हेतूने प्रेरित होऊन शोध लावले जातात. आताही हवामानाचे नियंत्रण करून दुष्काळाला मूठमाती देण्याचे संशोधन सुरू आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या चीनने यात मोठी आघाडी घेतली आहे.

सध्या चीनच्या या संशोधांच्या पर्यावरण युद्धासाठीच्या वापराचा धोका असल्याने जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. मात्र, जर या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केला तर पावसाचे नियंत्रण शक्य आहे. बीजिंग ऑलिम्पिक सुरू असताना चीनने पावसाला रोखले होते. तसेच याद्वारे पाऊसही पाडू शकतो.

अमेरिकेच्या बलाढ्य अशा जनरल इलेक्ट्रिक या कंपनीने 1946 मध्येच दाखवून दिले होते की एका विशिष्ठ परिस्थितीत ड्राय आईस अर्थात कोरडा बर्फ वापरून पाऊस पाडणे शक्य आहे. अमेरिकेत 1953 मध्येच अशा तंत्रज्ञानाने तब्बल 10 टक्के क्षेत्रावर पाउस पडल्याचे आकडे आहेत. मात्र, पुढे याचे दुष्परिणाम समजून घेऊन पर्यावरण युद्ध टाळण्यासाठी म्हणून 1978 मध्ये याविरोधात कायदा झाला.

जगातील सर्वांचे कल्याण लक्षात घेऊन पर्यावरणाच्या क्षेत्रातील हस्तक्षेप आणि याचे लष्करी वापर लक्षात घेऊन जगाने असे संशोधन किंवा प्रयोग करण्यावर बंदी घातली आहे. मात्र, चीनने आता याचा वापर लष्करीदृष्ट्या सुरू केल्याच्या शंकेने जगभरात चर्चा साल्याची बातमी नवभारत टाईम्स या आघाडीच्या वृत्तपत्राने दिली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here