बाबो… आता सरकार विकणार ‘त्याही’ कंपनीचा 63.75 हिस्सा; लागणार ‘एवढी’ बोली

दिल्ली :

केंद्र सरकारने आजवर अनेक सरकारी मालकीच्या कंपन्यांचा हिस्सा विकला आहे. दरम्यान या मुद्दयावरुन केंद्र सरकारवर सातत्याने टीकाही होत आहे. आता सरकार शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडियामधील आपली 63.75 हिस्सेदारी विकणार आहे. सरकारने यासाठी बोली मागवली आहे. सरकारला एससीआयमधील. 63.75 टक्के हिस्सा विकायचा आहे. सध्याच्या बाजार मूल्याच्या आधारे सरकारच्या शेअर्सची किंमत सुमारे 2500 कोटी रुपये आहे.

निर्गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएएम) याबाबत प्राथमिक माहिती निवेदन (पीआयएम) जारी केले आहे. संभाव्य खरेदीदारांकडून 13 फेब्रुवारी 2021 पर्यंत सरकारने लेटर ऑफ इंटरेस्ट (ईओआय) आमंत्रित केले आहे. सध्याच्या बाजारभावाच्या आधारे शिपिंग कॉर्पोरेशनमधील सरकारच्या भागभांडवलाचे मूल्य सुमारे अडीच हजार कोटी आहे.

निर्गुंतवणुकीची प्रक्रिया व्यवस्थापित करण्यासाठी सरकारने आरबीएसए कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्स एलएलपी यांची व्यवहाराची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. कॅबिनेटच्या आर्थिक व्यवहार समितीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शिपिंग कॉरपोरेशनच्या मोक्याच्या निर्गुंतवणुकीस तत्वत: मान्यता दिली होती.

तथापि, कोरोना विषाणूमुळे त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली. 2020-21 च्या अर्थसंकल्पात सरकारने 2.1 लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (सीपीएसई) मध्ये हिस्सा विकून सरकार आतापर्यंत 12,380 कोटी रुपये जमा करू शकली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here