इलेक्शन रिझल्ट : 6 ठिकाणी भाजप, तर 10 जागांवर गुपकार आघाडीवर, मुफ्तींची टीका

जम्मू आणि काश्मीर येथील जिल्हा विकास समिती (Jammu Kashmir DDC Elections Results) यांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये भाजप आणि गुपकार आघाडी यांच्यात थेट लढत आहे.

ANI on Twitter: “Jammu and Kashmir: Counting of votes for 280 constituencies of District Development Council (DDC) underway at Sher-I Kashmir International Conference Centre in Srinagar. Visuals of heavy security deployment outside the counting centre. https://t.co/li1S54vJaI” / Twitter

निवडणुकीचे निकाल लागण्यास अजूनही 4 ते 5 तास बाकी आहेत. मात्र, पहिल्या टप्प्यातील मतदानाचे निकाल जाहीर होत असल्याने मतदारांचा कल कोणाकडे आहे हे दिसण्यास सुरुवात झालेली आहे. सध्या सकाळी 10 वाजेपर्यंत भाजपला 6 तर गुपकार आघाडीला 10 जागांवर आघाडी आहे. तर, काँग्रेस 3 आणि इतर लोकांना 5 ठिकाणी आघाडी आहे.

जिल्हा परिषदेच्या 280 जागांसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली होती. या निवडणुकीवर बोलताना माजी मुख्यमंत्री आणि पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी (PDP) प्रमुख महेबुबा मुफ्ती यांनी टीका केली आहे. काश्मीरमधील लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पीडीपी नेता नईम अख्तर यांना ताब्यात घेऊन या निवडणुकीचे निकाल बदलण्याचा घाट भाजपने घातला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Mehbooba Mufti on Twitter: “J&K admin is on an arrest spree today. PDPs Nayeem Akhtar too has been abducted by J&K police & is being taken to MLA hostel. Looks like BJP is planning to manipulate DDC results tomorrow & don’t want any resistance. Democracy is being murdered in J&K.@manojsinha_ @JmuKmrPolice” / Twitter

मोठा सुरक्षा बंदोबस्त ठेऊन मतदानाची मोजणी चालू आहे. इथे काँग्रेस पक्ष गुपकार आघाडीत सहभागी झालेला नाही. त्यामुळे मतविभाजनाचा भाजपला कितपत लाभ मिळतो याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here