मोबाइल क्षेत्रात धमाका… 40 दिवस बॅटरी टिकणारा ‘हा’ फोन भारतात लॉंच; किंमत जाणून व्हाल आश्चर्यचकित

दिल्ली :

टेक्नो ही चिनी कंपनी आहे जीने आजवर नेहमीच बजेट फोन म्हणजेच 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे मोबाइल फोन बनवले आहेत. टेकनो स्पार्क 6 गो हा नवीन फोन भारतात लॉंच केला आहे. 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,699 रुपये आहे. एक्वा ब्लू, आईस जॅडिट आणि मिस्ट्री व्हाईट सारख्या कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला आहे.

टेक्नो स्मार्ट गो या फोनबाबत कंपनीने असा दावा केला आहे की,  या फोनचा स्टँडबाय वेळ 40 दिवसांपर्यंत आहे आणि या फोनवर एका चार्जमध्ये तुम्ही 54 तास बोलू शकता. टेकनो स्पार्क 6 गो ची प्रथम विक्री फ्लिपकार्टवर 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. 7 जानेवारीपासून आपण हा फोन ऑफलाइन स्टोअरमधून देखील खरेदी करू शकता.

हा फोन सध्या बाजारात असणार्‍या अनेक बड्या ब्रॅंडशी टक्कर घेणार आहे. 100 दिवसांच्या आत तुमच्या फोन स्क्रीनला काही झाल्यास स्क्रीन बदलण्याची ऑफरही आहे. कोणत्याही कारणामुळे या फोनची स्क्रीन तुटली किंवा खराब झाली तर आपण त्यास कंपनीकडून बदलून घेऊन शकता. वॉटर ड्रॉपर नॉच डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये बरीच भन्नाट वैशिष्ट्ये आहेत.

ही आहेत वैशिष्ठ्ये :-

स्क्रीन रिजॉल्यूशन 720×1600 पिक्सल, octa core MediaTek Helio A25 SoC प्रोसेसर, 5000 mAh बॅटरी, डुअल रियर कैमरा सेटअप,  प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सल,  8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here