मुंबई :
2020 मध्ये मात्र बर्याच इलेक्ट्रिक स्कूटरनी भारतीय बाजारपेठेत दार ठोठावले. परंतु काही स्कूटर अशा आहेत ज्यास हॉट लॉन्चिंग म्हटले जाऊ शकते. यापैकी सर्वाधिक चर्चा म्हणजे बजाज चेतक या स्कूटरच्या परतीची झाली. यावेळी कंपनीने चेतकला इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर केले आहे. 2020 च्या टॉप 7 इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घेऊया …
EeVe India म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेईकल इन इंडियाने आपल्या दोन जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर EeVe Atreo आणि Eeve Ahava लाँच केले आहेत. या दोन्ही स्कूटर मायलेज तर तगड देतातच. तसेच लूक आणि फीचर्समध्ये या बाकी स्कूटर्सला तोड देतात. EeVe Atreo ला ६४ हजार ९०० रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. तर Eeve Ahava ला कंपनीने ५५ हजार ९०० रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. EeVe Atreo ला एकदा फुल चार्ज केल्यानंतर ९० ते १०० किलोमीटर पर्यंततर Eeve Ahava ला सिंगल चार्जवर ६० ते ७० किलोमीटरपर्यंत चालवता येवू शकते.
ओकिनावा आर 30 (Okinawa R30) या इलेक्ट्रिक स्कूटरला ऑगस्ट 2020 मध्ये सादर करण्यात आले होते. स्कूटरची टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे आणि ती एका चार्जवर 60 किमी पर्यंत जाऊ शकते. स्कूटरमध्ये 1.25kWh लिथियम आयन बॅटरी आहे. किंमत 58,992 रुपये आहे.
अँपिअर मॅग्नस प्रो(Ampere Magnus Pro): ही इलेक्ट्रिक स्कूटर यावर्षी जूनमध्ये लाँच केली गेली. या स्कूटरची उच्च गती 55 किमी / ताशी आहे आणि एकदा चर्जिंगकेल्यावर 80 किमी पर्यंतची मायलेज देते. अँपिअर मॅग्नस प्रोची एक्स-शोरूम बेंगळुरू किंमत 73990 रुपये आहे.
प्यूअर ईव्ही इप्लूतो 7 जी(Pure EV EPluto 7G): ईव्हीने फेब्रुवारी 2020 मध्ये हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ईप्लूटो 7 जी लाँच केले. या स्कूटरची गती 60 KMPH आहे.एका चर्जिंगमध्ये ही स्कूटर 90-120 किमी पर्यंत प्रवास करू शकते. स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 79,999 रुपये आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- म्हणून शेतकरी-सरकार बैठक ठोस निर्णयाविनाच संपली; पहा नेमके काय झालेय
- आले की अच्छे दिन; प्रत्येकाला मिळणार 1 लाख रुपये, पहा कोणी घेतलाय जनहिताचा निर्णय
- भाजीपाला मार्केट अपडेट : एकाच क्लिकवर पहा पालक, शेपू, कोथिंबीर, मेथीसह पातीचे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा सोलापूर, पारनेरला किती भाव खातोय कांदा
- मुंबई बाजारभाव : पहा एकाच क्लिकवर संपूर्ण पिकांचे मार्केट अपडेट