सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : 10वी, 12 वी आणि पदवीधारक करू शकतात अर्ज; विविध पदांसाठी भरती

दिल्ली :

सध्या जगभरात लोकांवर आर्थिक संकट आलेले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात झाली आहे. उद्योग–धंदे करणारे छोटमोठे व्यावसायिकही अडचणीत आहेत. एकूण जगभरात अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारने एक मोठी सुवर्णसंधी आणली आहे. १० वी पास ते पदवीधारकपर्यंत अनेक लोक यासाठी अर्ज करू शकतात.

ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये नॉन फॅकल्टी ग्रुप बी व सीच्या शेकडो पदांवर भरती काढण्यात आली आहे. यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांची भोपाळच्या एम्समध्ये (AIIMS Bhopal) नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती वेगवेगळ्या पदांसाठी होणार आहे.

असा करा अर्ज :-

  • या पदभरतीसाठी बेसिलच्या becil.com किंवा या becilaiimsbhopal.cbtexam.in वर जावे लागणार आहे. किंवा पुढे दिलेल्या डायरेक्ट लिंकवरही क्लिक करू शकता.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ डिसेंबर २०२० आहे. म्हणजेच अर्जासाठी आठवडाच शिल्लक राहिला आहे.
  • ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ही १० डिसेंबरपासून सुरु झाली आहे.

 ही आहेत पदे :-

कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, स्टेनोग्राफर, अपर व लोवर डिव्हिजन क्लार्क, स्टोअर कीपर, एडमिन ऑफिसर, असिस्टेंट इंजीनियर, पब्लिक हेल्थ नर्स, लायब्रेरियन, मॅनेजर, डाएटीशियनसह अनेक पदांवर जागा भरण्यात येणार आहेत.

संपादन :- विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here