सदाभाऊच्या यात्रेला भाजपचे सारथ्य; आत्मनिर्भर यात्रेद्वारे मोदींच्या कायद्याचे गायले जाणार गोडवे

दिल्लीतील आंदोलनाला दलालांचे आंदोलन म्हणून हिणवणाऱ्या आणि भाजपचे मित्रपक्ष असलेल्या भाजपने आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे सारथ्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकरी कायदे योग्य असल्याचे सांगण्यासाठी खोतांनी किसान आत्मनिर्भर यात्रा आयोजित केली आहे.

24 डिसेंबरपासून ही आत्मनिर्भर यात्रा सुरू होणार आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमदार आशिष शेलार हे सक्रीय सहभागी असणार आहेत. त्यामुळे खोतांची ही यात्रा वास्तविक थेट भाजपची यात्रा असल्याची चर्चा सुरू झालेली आहे.

तीन टप्प्यातील या यात्रेत पहिल्या टप्प्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 4 दिवसांची, त्यानंतर मराठवाडा, विदर्भ असे संपूर्ण राज्यात ही यात्रा पुढील टप्प्यात असणार आहेत. 24 डिसेंबरपासून ही यात्रा सुरू होणार असून 27 डिसेंबर रोजी या यात्रेची सांगता होणार आहे. शेलार यांच्या हस्ते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सांगलीच्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून ही यात्रा सुरू होईल.

सांगता सभेला फडणवीस आणि पाटील हे दोन्ही दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत. शिरोळ, इचलकरंजी, पेठ वडगाव आणि इस्लामपूर येथे सभा घेण्यात येणार आहे. सर्व ठिकाणी भाजप सक्रीय असणार असल्याने भाजप नेतेच या यात्रेचे अप्रत्यक्षपणे सारथी झाल्याने त्यावर टीका होत आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here