म्हणून मोदी सरकारने घेतला महत्वाचा निर्णय; करोनाच्या नव्या विषाणूमुळे उडाली खळबळ

ब्रिटनमधील संशोधन हे उच्च दर्जाचे असते. याच देशात आता करोना विषाणूचा आधुनिक आणि आणखी भयंकर प्रकार सापडला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ब्रिटन देशामध्ये जाणाऱ्या-येणाऱ्या सर्व फ्लाईट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. भारताने ब्रिटनमधील विमान वाहतूक बंद करण्यापूर्वीच अनेक देशांनी हा निर्णय घेतला होता. सध्या इंग्लंडमध्ये सापडलेला करोना विषाणूचा अवतार 70 टक्के आणखी घातक असल्याचा दावा आहे.

संशोधकांच्या या निष्कर्षामुळे अवघ्या जगात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतीय शेअर बाजारावरही यांचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे एकाच दिवसात बाजाराने 7 लाख कोटी रुपयांचा झटका सहन केला आहे.

संपादन : सचिन पाटील

MoCA_GoI on Twitter: “Considering the prevailing situation in UK. Govt. of India has decided that all flights originating from UK to India to be suspended till 31st December 2020 (23.59 hours).” / Twitter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here