चेहर्‍यावर असणार्‍या खड्ड्यांमुळे सौंदर्यावर परिणाम; त्यावर ‘हे’ आहेत घरगुती उपाय

अनेकदा चेहऱ्यावर आलेले पिंपल्स जातात, डागही जातात पण त्यामुळे तयार झालेले खड्डे मत्र तसेच राहतात. ज्याचा आपल्या सौंदर्यावर परिणाम होत असतो. डाग घालवण्यासाठी किंवा पिंपल्स घालवण्यासाठी आज मार्केटमध्ये अनेक क्रीम्स उपलब्ध आहेत. तसेच यावरील घरगुती उपायही लोकांना माहिती आहेत. पण पिंपल्समुळे चेहऱ्यावर आलेल्या खड्ड्यांना कसे घालवायचे त्यावर उपायकारक क्रीमही नाहीत. तसेच त्यावरील घरगुती उपायही अनेकांना माहिती नाहीत. म्हणूनच आज आम्ही आपल्याला चेहऱ्यावर पडलेल्या खड्डे घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

  • बारीक आणि मऊ असे बेसन घ्या. त्यात लिंबू आणि दूध मिसळा. या मिश्रणाची पेस्ट त्वचेवर लावल्यास चेहर्‍यावरील खड्ड्यांचा आकार कमी होण्यास मदत होते.
  • लिंबूरस आणि मधाचं मिश्रण चेहऱ्यावर लावा. २४ तासात किमान २-३ वेळा हा उपाय करावा.
  • मुलतानी माती, लिंबाचा रस, गुलाबपाणी हे मिश्रण एकत्र करून त्वचेवर लावल्यास त्वचा मुलायम तर होतेच तसेच चेहर्‍यावर असणारे खड्डे कमी होतात.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here