सौंदर्यासाठी ‘फेसपॅक’चा अती वापर करताय; भोगावे लागतील हे दुष्परिणाम

सुंदर दिसाव असे कुणाला वाटत नाही, मात्र त्यासाठी अती प्रमाणात उपाय करणारे अनेक तरुण, तरुणी आपल्याला दिसतील. शहरातील काही लोक तर सुंदर दिसण्यासाठी काहीही अघोरी उपाय करतात आणि आपल्या चेहर्‍याची वाट लावून घेतात.

आजकाल चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी फेसपॅक वापरत नाही असे तरुण- तरुणी शोधूनही सापडणार नाहीत. अपूर्ण ज्ञानातून जेव्हा आपण फेसपॅक वापरतो तेव्हा त्याचे परिणाम निश्चित होत असतात. तसेच अति फेसपॅकचा किंवा फेसमास्कचा वापर तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं.

  • तुम्ही वापरत असलेल्या फेसपॅकमध्ये तुमच्या त्वचेसाठीचे पोषक घटक नसतील तर चेहऱ्यावर पुरळ उठण्याची शक्यता असते.
  • सातत्याने फेसपॅकमध्ये बदल करत अस्ताल तर त्वचा हळूहळू लाल होते.
  • जर तुमच्या चेहऱ्यासाठी सतत फेसपॅकचा वापर करू शकत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल दिवसेंदिवस कमी होईल. परिणामी तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. याचा परिणाम ३-४ वर्षांनी चेहरा फ्रेश दिसत नाही.
  • क्ले मास्क तेलकट आणि एक्ने असलेल्या त्वचेसाठी उत्तम असले तरी त्यामुळे तुमची त्वचा राठ होऊ शकते. कारण अतीप्रमाणात वापरलेल्या क्ले मास्कमुळे तुमच्या त्वचेतील मऊपणा कमी होऊ शकतो.
  • पील ऑफ मास्कमुळे तुमच्या त्वचेच्या वरच्या थरातील पेशींचे नुकसान होऊ शकते. यासाठी असे मास्क महिन्यातून एकदाच वापरावेत.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here