पाकिस्तान आणि भारताच्या सीमेवर असणारे अनोखे रेल्वे स्टेशन: ‘ती’ एक गोष्ट नसल्यावर होते मोठी कारवाई; ‘या’ स्टेशनची वैशिष्ट्ये वाचून व्हाल हैराण

भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही मोठ्या प्रमाणात तणाव जाणवत असतो. दोन्हीही देशातून विस्तव सुद्धा जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. पाकिस्तान नेहमीच भारतावर कुरघोड्या करत असतो. भारतही त्यांना योग्यवेळी संधी साधून नांग्या ठेचत असतो. एकूणच अशी परिस्थिती असताना हे दोन्ही एका ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या मिळालेले आहेत.

पाकिस्तान आणि भारताच्या सीमेवर असणारे अनोखे आणि एकमेव रेल्वे स्टेशन हे एक आश्चर्यच आहे. अटारी असे या रेल्वे स्टेशनचे नाव असून इथे अनेक कायदे आणि नियम पाळले जातात. या स्टेशनची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे इथे आपल्याला विना पासपोर्ट आणि व्हिसा जाता येत नाही. जर तुम्ही विना विना व्हिसा आणि पासपोर्ट प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विशेष म्हणजे दोन्हीपैकी एक देश तुमच्यावर मोठी कारवाई सुध्दा करू शकतो.

वाचा ही वैशिष्ट्ये :-

  • या स्टेशन वर गेल्यानंतर आपल्याला तिकीट घेण्यापूर्वी आपला व्हिसा आणि पासपोर्ट दाखवावा लागतो त्यानंतर तिकिटावर तुमच्या पासपोर्ट चा क्रमांक छापल्या जातो आणि त्यांनंतर आपल्याला तिकीट मिळतं. त्या नंतरच सीट मिळते.  
  • आपल्या देशाचं हे एकमेव रेल्वे स्टेशन असेल ज्यावर दिवसाचे २४ तास कडक पोलीस बंदोबस्त असतो आणि देशाच्या गुप्तचर संघटना कार्यरत असतात.
  • या रेल्वे स्थानकावर आपल्याला कोणत्याही प्रकारचे कुली मिळत नाहीत. येथे प्रत्येकाला आपले सामान स्वतः घेऊन जावे लागते.
  • या स्थानकावर गाडीला हिरवा झेंडा दाखविण्या अगोदर सर्व प्रवाशांना एक वेळ विचारल्या जाते. त्यांनंतरच रेल्वे गाडीला सोडल्या जाते.
  • जर काही कारणास्तव रेल्वे गाडीला उशीर झाला तर दोन्ही देशांच्या रेल्वे मुख्यालयाला कळविले जाते. आणि दोन्ही देशांच्या रजिस्टर मध्ये या गोष्टीची नोंद केल्या जाते.
  • आपल्या माहिती साठी या स्टेशन वर फोटो काढण्यास सक्त मनाई आहे.
  • या स्थानकाच्या आत मध्ये जाता येत नाही आणि आपल्याला जर जायचे असेल तर गृह मंत्रालयाच्या दोन विभागांची परवानगी घेऊन आतमध्ये जाता येते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here