आता व्हॉट्सअॅप देणार झूमला टक्कर; ‘त्या’ एका फीचरच्या जिवावर चालूय दोघात स्पर्धा

मुंबई :

व्हॉट्सअॅप डेस्कटॉप अ‍ॅप आणि वेबसाठ व्हिडीओ कॉलिंग फीचरवर काम करीत आहे. लवकरच हे फीचर उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फेसबुकच्या मालकीची कंपनी असणारी व्हॉट्सअ‍ॅप बर्‍याच काळापासून आपल्या वेब वापरकर्त्यांसाठी कॉलिंग फीचर देण्याचा प्रयत्न करीत आहे. कित्येक महिन्यांपासून हे फीचर डेवलप करण्याचे काम सुरू आहे. आता हे फीचर लवकरच येणार आहे. आणि याच फीचरच्या जिवावर व्हॉट्सअॅप थेट झुमशी स्पर्धा करणार आहे.

WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल फीचर्स आता बीटामध्ये उपलब्ध आहे. गेल्या वर्षापासून झुमने व्हिडिओ कॉलमध्ये सगळे मार्केट खाल्ले होते. अद्यापही झुमला तगडा प्रतीस्पर्धी मिळालेला नाही. मात्र आता व्हॉट्सअॅप आता झुमशी टक्कर घेत मार्केटचा फ्लो आपल्या दिशेने करू शकते.

एकदा चाचणी पूर्ण झाल्यानंतर व्हॉट्सअॅप वेब वापरकर्ते डेस्कटॉपद्वारे व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल करण्यास सक्षम असतील. एकदा फीचर आल्यावर व्हॉट्सअ‍ॅप हे झूमसारख्या वेब व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप्स जसे की गूगल मीट आणि मायक्रोसॉफ्ट टीमला मोठी स्पर्धा निर्माण करील. बर्‍याच लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरत आहेत आणि इतर अ‍ॅप्सच्या विपरीत, व्हॉट्सअ‍ॅपवर साइन अप करण्याची आवश्यकता नाही. या कारणास्तव, अन्य प्लॅटफॉर्मपेक्षा व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉलिंग अधिक लोकप्रिय होऊ शकते.

संपादन : स्वप्नील पवार  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here