क्रेडिट कार्डच्या प्रत्येक पेमेंटवर ‘अशा’ प्रकारे मिळवा कॅशबॅक; जाणून घ्या प्रोसेस

मुंबई :

आजकाल क्रेडिट कार्ड वापरत नाही अशी माणसे शहरांमध्ये शोधूनही सापडणार नाहीत. विविध फीचर्स आणि वापरायला मिळणारी भलीमोठी रक्कम यामुळे तरुणाई तर क्रेडिट कार्ड सर्रास वापरताना दिसते. अनेकदा क्रेडिटकार्डवर विविध ऑफर्स मिळतात. मात्र त्यासाठी अनेक नियम व अटी असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्डच्या प्रत्येक पेमेंटवर कॅशबॅक कसा मिळवायचा, याविषयी सांगणार आहोत.

तुम्हाला थोडे आश्चर्य वाटले असेल, मात्र हे खरे आहे. क्रेडिट कार्डच्या प्रत्येक पेमेंटवर कॅशबॅक मिळवणे शक्य आणि सोपे आहे मात्र यासाठी तुम्हाला आधी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्ही सहजरित्या क्रेडिड कार्डवर कॅशबॅक मिळवू शकता.

क्रेडिट कार्ड पेमेंट अ‍ॅप CREDवर प्रत्येक क्रेडिट कार्डवर कॅशबॅक मिळवण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही सहज कार्डाचं पेमेंट CRED द्वारे करू शकता आणि कॅशबॅकसह इतर अनेक ऑफर्सचा आनंद घेऊ शकता. 

वाचा सर्व माहिती मुद्देसूद आणि थोडक्यात :-

1)  आधी तुम्हाला सीआरईडी अ‍ॅप डाउनलोड करणं महत्त्वाचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर त्यामध्ये लॉगिन करा.

2)   सीआरईडी अ‍ॅप लॉगिन करण्यासाठी थोडा वेळ घेतं, पण त्यानंतर मात्र तुम्ही सहज व्यवहार करू शकता.

3) सीआरईडी अॅपमध्ये तुमच्या बँक खात्याशी संबंधित माहितीची पडताळणी करावी लागेल. सगळ्या विशेष म्हणजे प्रत्येक कार्डवर किती पैसे द्यायचे हे अ‍ॅप स्वतःच दाखवतं. यासाठी, तुम्हाला आधी क्रेडिट कार्डचं पेमेंट करणं आवश्यक आहे. तुम्ही अॅपद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट करू शकता. असं केल्याने तुम्हाला सीआरईडीकडून काही गुण दिले जातात.

4) यानंतर तुम्ही मिळवलेल्या या पॉइंट्समधून कोणतीही ऑफर खरेदी करू शकता. ज्यामध्ये तुम्ही ब्रँड डिस्काउंटची ऑफर असेल किंवा अनेक इतर ऑफर्स असतात. तुम्ही यामध्ये अनेक गुण मिळवले तर तशा ऑफर्सही तुम्हाला मिळतात. कॅशबॅकसाठी हेच आहे. हे गुण वापरण्यासाठी तुम्हाला कॅशबॅक कूपन घ्यावं लागतं. जे 1000, 5000 गुणांवर मिळतं.

5) म्हणजेच समजा जर तुम्ही 6 हजार रुपयांची कूपन घेतली. तर जेव्हा तुम्ही त्याला अॅक्टिव्हेट कराल तेव्हा तुम्हाला कॅशबॅकची संधी आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here