बाबो… टीम इंडियाला कांगारूंचा झटका : ६ बाद १९ धावा, ‘अशी’ झाली अवस्था

मुंबई :

जोरदार पद्धतीने खेळी करणार्‍या टिम इंडियाला आता कांगारूंनी जोरदार झटका दिला आहे. विराटसह संपूर्ण टिम इंडियालाही आपला प्रभाव ऑस्ट्रेलियासमोर टाकता आला नाही. टिम इंडियाचे खेळाडू चक्क शून्यावर बाद होऊ लागले. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवताना टीम इंडियाला एकामागून एक धक्के दिले. 

जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा यांचा अडथळा दूर करत जोश हेझलवूडनं एकाच षटकात दोन धक्के देताना टीम इंडियाची अवस्था ५ बाद १५ अशी केली. १ बाद ९ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघानं सह धावांत चार विकेट्स गमावल्या. त्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव कांगारूंनी २४४ धावांवर संपवला.

विराट कोहली ४ धावांवर माघारी परतला. पदार्पणवीर कॅमेरून ग्रीननं अविश्वसनीय झेल घेताना विराटला चलते केले. टीम इंडियाची अवस्था ६ बाद १९ अशी झाली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here