‘ब्रँड वाघ’ काळाच्या पडद्याआड… शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं निधन; ‘अशी’ घडली घटना

मुंबई :

शिवसेना नेते आणि माजी खासदार मोहन रावले यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. गोव्यात काही कामा निमित्त ते गेले होते. त्यावेळी त्यांचं निधन झालं. मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आज आणलं जाणार आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचे पहिले अध्यक्ष होते.

ते ७२ वर्षांचे होते. काही कामानिमित्त गोवा येथे गेले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मोहन रावले यांनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे पाचवेळा प्रतिनिधित्व केले होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी परळ लालबागमध्ये जे कडवट शिवसैनिक निर्माण केले, त्यातील मोहन रावले हे पहिल्या फळीचे शिवसैनिक होते. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील, असं वाटलं नव्हते. परळ ब्रँड शिवसैनिक हिच त्यांची ओळख होती, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मोहन रावले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here