632 कोटीवाल्या सिंग यांच्याबद्दलची ‘ही’ आहे खरी माहिती; शेतकरी आंदोलनातूनही आहेत सध्या बाहेर..!

सोशल मिडीयामध्ये खोट्या माहिती आणि बातम्यांचा आधाराने दिल्लीतील शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा डाव केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या समर्थकांनी आखला आहे. त्यामुळेच अनेक खोटे आणि चुकीचे दावे करून आंदोलक देशद्रोही असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील 632 कोटीवाल्या सिंग यांच्याबद्दलची माहितीही बऱ्याच अंशी चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

सध्या उत्तरप्रदेश राज्यातील 632 कोटी रुपये संपत्तीचे मालक असलेल्या व्ही. एम. सिंग यांच्या इमेज आणि फोटोला सोशल मीडियामध्ये मोठी मागणी आहे. काँग्रेस पक्षाच्या या नेत्याने शेतकरी आंदोलनास मदत केली असून काँग्रेस नेते राहुल गांधी अदानी आणि आणि अंबानी यांना लक्ष्य करीत आहेत. एकूणच काँग्रेस पक्ष सर्वांची दिशाभूल करीत असल्याच्या बातम्या यानिमित्ताने पुन्हा एकदा पेरल्या जात आहेत.

यावर ALT न्यूज यांनी खरी माहिती देणारे आणि पुरावे सादर करणारा लेख प्रसिद्ध केला आहे. त्यात सिंग यांच्या संपत्तीचे आकडे खरे असल्याचे म्हटले आहे. त्याचे पुरावेही त्यांनी दिलेले आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांच्या राजकीय माहितीमध्ये खूप काही गोलमाल केल्याचेही ALT ने दाखवून दिलेले आहे.

S Gurumurthy on Twitter: “All his sins are washed by media. ‘Farmer leader’ VM Singh protesting against farm bills is actually a Congress leader accused in 8 cases, has assets worth Rs 631 crores according to his list of assets for Pillibhit Lok Sabha seat for 2009 https://t.co/rpYHmxKIko via @OpIndia_com” / Twitter

ऑप इंडिया नावाच्या वेबसाईटवर सिंग हे काँग्रेस नेते असल्याचे आणि त्यांचा आंदोलनास राजकीयदृष्ट्या सक्रीय पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. हीच बातमी अनेक भाजप समर्थकांनी जोरदारपणे शेअर केली आहे. मात्र, यातील माहिती अंशतः सत्य असून त्याचाच फायदा घेऊन आंदोलकांना काँग्रेसी असल्याचा शिक्का भाजपकडून मारला जात आहे.

सिंग हे 2012 च्या अगोदर काँग्रेस पक्षात होते. नंतर त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेस पक्ष आपलासा केला आहे. भाजप खासदार मनेका गांधी या सिंग यांच्या चुलत बहिण आहेत. 2015 मध्ये त्यांनी स्वतंत्र राष्ट्रीय किसान मजदूर पार्टी याची स्थापना करून 2017 च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, समाजवादी आणि बहुजन समाज पार्टी या सर्वांच्या विरोधात उमेदवार दिले होते. आताही शेतकरी आंदोलनात ते असताना त्यांनी उलटसुलट वक्तव्य केल्याने आंदोलकांनी त्यांना यापासून बाजूला केले आहे.

Facts on Twitter: “Sardar V M Singh demanding MSP Law is a Congress leader. He was Lok Sabha candidate from Pilibhit. In 2009 he has assets worth ₹6.32 billion. #GareebKisaan https://t.co/Sn9a8Sl4Gm” / Twitter

414 एकर शेतजमिनीचे मालक असलेल्या सिंग यांच्याकडे अधिकृतरीत्या 632 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. ते आताच्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. मात्र, समन्वयक असतानाही आंदोलनातील मागण्या सोडून इतर मागण्या करून आंदोलनातील गांभीर्य कमी करण्याच्या प्रयत्नामुळे त्यांना यापासून बाजूला केल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. एकूणच यामुळे शेतकरी आंदोलन आणि काँग्रेस पक्षाचा संबंध ही निव्वळ अफवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ALT न्यूज यांची मूळ बातमी, इतर पुरावे आणि माहितीसाठी पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा : किसान प्रदर्शन में शामिल होने वाले 600 करोड़ की संपत्ति के मालिक वीएम सिंह कांग्रेस से जुड़े हैं? – Alt News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here