मारूतीपासून ते टाटापर्यंत ‘या’ विविध कंपन्यांच्या 6 गाड्यांवर मिळतोय ३ लाख रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट; जानेवारीत महाग होणार

मुंबई :

कार खरेदी साठी डिसेंबर महिना हा दरवर्षी बेस्ट असाच असतो. कारण, अनेक कार निर्माता कंपन्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या कारच्या किंमती वाढवत असल्याचे आजपर्यंत दिसले आहे. त्यामुळे आता जानेवारी महिन्यात किआ, ह्युंदाई आणि मारुती कारने आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

तोपर्यंत जाणून घ्या काही गाड्यांविषयी ज्यावर बंपर डिस्काउंट मिळत आहे. डिसेंबर महिन्यात मारूतीपासून टाटापर्यंत अनेक ऑटो कंपन्या आपल्या कारवर ३ लाख रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट देत आहेत.

1)  महिंद्राची प्रसिद्ध असलेली आणि थेट टोयोटा फॉर्च्यूनरशी स्पर्धा करणारी महिंद्रा अल्टूरस या गाडीवर ३.०६ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. 

2)  ऑफरोडसाठी खरेदी केली जाणारी आघाडीची एसयूव्ही ही जीप कंपास आहे. आणि जीप कंपासवर एकूण २ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. 

3)  भारतीयांच्या पसंतीस उतरलेली रेनॉ डस्टर या या कार खरेदीवर १ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

4)  डिसेंबर महिन्यात मारुती विटारा ब्रेझाच्या खरेदीवर ५६ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.

5)  टाटा हॅरियर या कारवर तुम्हाला ६५ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो.

6)  मारुती सुझुकी एस-क्रॉसवर ग्राहकांना ६८ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.

यापैकी अनेक कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमती जानेवारीत वाढवणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here