बाय..बाय..2020 : ‘त्या’ पाच घटनांनी हादरला होता पूर्ण देश..!

अवघ्या जगाला नव्या वर्षाचे वेध लागले आहेत. अशावेळी भारतातही अनेकांना आता नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे वेध लागले आहेत. तर, काहींना मागील वर्षामधील महत्वाच्या घडामोडी आठवत आहेत. एकूण कायदा-सुव्यवस्था आणि राजकीय लागेबांधे यांना आव्हान देणाऱ्या पाच गोष्टींची आपण आठवण काढणार आहोत.

  1. या वर्षामधील पाच महत्वाच्या घटना अशा :
  2. गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर केस : अनेक राजकीय नेत्यांच्या मनात दहशत निर्माण झाली होती जेंव्हा या विकास दुबेला अटक होणार होती. मात्र, पोलिसांनी एन्काऊंटर करून या डाकुचा अंत केला. कानपूर येथील या गुन्हेगाराने 8 पोलिसांना मारून फरार होण्याची कामगिरी केली होती. त्याला पकडले तर राजकारणात त्यामुळे अनेकांना घरी बसण्याची शक्यता होती. अशावेळी त्याचा खातमा पोलिसांच्या टीमने केला. हे फेक एन्काऊंटर असल्याची चर्चा अजूनही सुरू आहे.
  3. हाथरस गँग रेप : 14 सप्टेंबर 2020 रोजीच्या या घटनेने अवघा देश हादरला होता. 20 वर्षीय दलित मुलीचा मृत्यू त्या घटनेत झाला होता. पोलिसांनी परस्पर मृत पिडीत मुलीचा अंत्यविधी उरकल्याने जगभरातून या घटनेबद्दल उलटसुलट शक्यता व्यक्त होत आहेत.
  4. पालघर मॉब लीन्चिंग केस : चोर असल्याच्या अफवा आणि लॉकडाऊन काळात 16 एप्रिल 2020 रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत दोन साधू आणि त्यांचा वाहनचालक यांचा करुण अंत झाला. भाजपने यावरून देशभरात राजकारण केले. याप्रकरणी गावातील 134 लोकांना पोलिसांनी अटक करूनही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने यावरून मोठे राजकारण केले. अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही.
  5. शिवहार कांड : बिहार निवडणुकीतील जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंग यांची 24 ऑक्टोबर 2020 या दिवशी दोन मोटारसायकल स्वरांनी गोळी घालून हत्या केली होती. बिहार निवडणुकीत हा मुद्दा खूप गाजला होता.
  6. दिल्ली हिंसा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागरिकता कायद्याच्या विरोधात आंदोलन चालू असताना दिल्लीत हिंदू आणि मुस्लीम कट्टरपंथीय यांच्यात तेढ निर्माण होऊन ही हिंसा उद्भवली होती. भाजपने यात ठोस भूमिका घेतली नाही. उलट अनेक भाजप नेत्यांनी या आगीत तेल ओतले. दोन्ही बाजूने याचे राजकारण करण्यात आले. सुमारे 50 जणांना या दंगलीत आपला जीव गमवावा लागला. करोना विषाणूचे संकट आले नसते तर यात आणखी अनेकांना राजकीय आहुती द्यावी लागली असती.

अशा पद्धतीने राजकीयदृष्ट्या गुन्हेगारी आणि सामाजिक घटनांचे राजकारण 2020 या वर्षातही जोमात करण्यात आले. 2021 मध्ये असे होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सर्व समाजाने राजकीयदृष्ट्या गुन्हेगारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे. नाहीतर पुढील वर्षही असेच गुन्हेगार आणि राजकीय नेत्यांच्या यशासाठी ओळखले जाईल.

स्त्रोत : हरीभूमी ऑनलाईन आणि गुगल

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here