‘त्या’ एका कारणामुळे आर्मी वाल्यांना दारू दिली जाते स्वस्त; जाणून घ्या रंजक माहिती

दारू शरीराला हानिकारक आहे हे सगळ्यांना माहिती आहे. दारूमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेली अनेकांनी पाहिलेली आहेत. पण तरी देखील लोक दारू पितातच. कितीही काही झालं तरी दारू कोणी सोडत नाही. अनेक गावांमध्ये, जिल्ह्यात, दारूबंदी ची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण एवढे सगळे असताना जवानांना दारू का दिली जाते? तसेच दारू तर देतात वरून स्वस्तही देतात? हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल.

आर्मी म्हणजे शिस्त, आपण लहानपणी अनेक धड्यांमध्ये जवानांची शिस्त किती कडक असते याविषयी ऐकले वाचले आहे. सैन्यात शिस्त व परंपरा याला खूप महत्त्व आहे. रॉयल सेनेत नेहेमीच दारू पिण्याची परंपरा राहिली आहे. ब्रिटीश सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना खाण्यापिण्याच्या इतर वस्तूंसोबतच एका निश्चित प्रमाणात दारू देखील दिली जायची. ब्रिटीश सेना जेव्हा भारतात आली, तेव्हा त्यात समाविष्ट झालेले भारतीय जवान देखील ती परंपरा पाळायला लागले.

जवानांना देशाच्या रक्षणासाठी कुठेही कश्याही परिस्थितीत आपली ड्युटी करावी लागते.ते आपल्या घरापासून हजार किलोमीटर दूर सीमेवर राहतात. जिथे कधीकधी कुठलीही सुविधा नसेल अश्या ठिकाणी त्यांना राहावं लागतं. कधीकधी शुन्याहून कमी तापमान असलेल्या ठिकाणी त्यांना पहारा द्यावा लागतो.

पण अशा थंड ठिकाणी सीमेवर पहारा देणे खूप कठीण होऊन जाते. तेव्हा त्या थंडीपासून वाचवण्यासाठी मद्यपान करणे आवश्यक ठरते कारण त्याने शरीर गरम राहतं. बर्फाळ प्रदेशांव्यतिरिक्त देखील जवानांना इतरही प्रदेशात अनेक बिकट परिस्थितींचा सामना करावा लागतो. मग अशा परिस्थितीत दारू ही त्यांची सोबती म्हणून काम करते. त्यांच धैर्य टिकवून ठेवण्याचं काम ही दारू करते.

हे सगळे झाले दारू पिण्याविषयी. पण दारू किती प्यावी यासाठी तिथे नोंद असते. कुठल्याही सैनिकाला अतिरिक्त दारू दिली जात नाही. सेनेत अधिक प्रमाणात दारूचे सेवन करणे म्हणजे गुन्हा मानला जातो.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here