‘त्या’ देशाची मदत घेत पाकिस्तानने सुरू केला मोठा प्रकल्प; भारताला मोठा झटका

दिल्ली :

काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावर असे म्हटले जात आहे की, एकाच वेळी अनेक देशांशी पंगा घेणे भारताला महागात पडू शकते. आणि आता त्याचेच चित्र समोर दिसू लागले आहे. काही दिवसांपूर्वीच रशियन सैन्य आणि पाकिस्तान आर्मी यांनीही संयुक्त सरावामध्ये भाग घेतला होता. या संयुक्त सरावावरून भारताने रशियाच्या सहभागावर तीव्र आक्षेप व्यक्त केला होता.

पाकिस्तानला आजवर कितीही समजावले तरीही ते त्यांच्या खुळ्या डोक्याप्रमाणे भूमिका घेत काम स्वत:चे नुकसान करून घेतात. आता रशिया आणि पाकिस्तान एका कराराच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. रशियाच्या मदतीनं पाकिस्तान ११०० किमी लांब गॅस पाइपलाइनचं निर्माण करणार आहे. यामुळे पाकिस्तान लिक्विफाइड गॅसच्या दिशेने जास्त टर्मिनल ऑपरेट करू शकेल. रशियन कंपनी कराचीच्या कासिम बंदरगाहपासून पंजाबच्या कसूरपर्यंत ११२२ किमी पाइपलाइनसाठी लिक्विड नैसर्गिक गॅस निर्माण करणार आहे.

पाकिस्तान थेट भारताच्या विरोधात आहे. रशिया मात्र थेट भारताचा विरोध पत्करू शकत नाही. शीत युद्धाच्या काळात पाकिस्तान रशियाविरोधी गटात सामील होता आणि रशिया भारताच्या अगदी जवळ होता. भारतदेखील आतापर्यंत आपल्या संरक्षण गरजांसाठी रशियावर अवलंबून होता आणि तेथून जवळजवळ सर्व शस्त्रे करार केले गेले होते. पण मागील काही काळात भारत इस्राईल आणि अमेरिकेशीही आपल्या संरक्षणविषयक गरजा भागवत आहे.

असे असले तरीही भारत अद्याप रशियाशी चांगले संबंध ठेऊन आहे. गेल्या काही वर्षांत भारताचा पारंपारिक आणि विश्वासू मित्र रशियासोबत पाकिस्तानची जवळीक वाढली आहे. दोन्ही देश या कराराला आर्थिक आणि रणनीती भागीदारी बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल म्हणून सांगत आहेत. विशेष बाब म्हणजे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान या दोघांनीही या करारात विशेष रस दाखवला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here