‘शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा’ असे म्हणत ‘या’ भाजप नेत्याची राऊतांवर जहरी टीका; दिले शिवरायांचे ‘ते’ उदाहरण

मुंबई :

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. 2 दिवसांपूर्वी केलेल्या टीकेला उत्तर देताना पडळकर यांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे. पडळकर यांनी राऊतांना थेट पत्र लिहीत म्हटले आहे की, खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीनं आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही.

प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे. प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला हानला. यावेळी “राज्याच्या प्रतिष्ठेवर दारुची गुळणी करणाऱ्याला जाब विचारताना संजय राऊतांनी दारुची दुकानं उघडून मंदिर बंद ठेवण्याने राज्याची कोणती प्रतिष्ठा वाढली गेली हे ही सांगावे. फक्त टीका केली म्हणून एखाद्या नटीला जेरीस आणायचं अन् उखाड दिया म्हणत अशा भुरट्या मर्दानगीचं प्रदर्शन मांडायचं हे कसलं स्त्रीदाक्षिण्य? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही दाखले देत आपलं राजकारण करता त्यांचा आदर्श विसरलात का? शत्रुगटातील स्त्री असली तरी तिची खणा-नारळाने ओटी भरुन यथोचित सन्मान करण्याची आपली परंपरा आहे. का ते ही महाविकास आघाडीत जाऊन विसरले?” असे अनेक सवाल पडळकरांनी राऊतांना विचारले आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here